कोल्हापूर – आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात गोकुळच्या अध्यक्ष पदाची निवड केली जात आहे. यावेळी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांनी तर महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.
या बैठकीत बहुमत असलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या संचालकांनी, शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांना सात दिवसांची नोटीस नसल्याने त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये, असा आक्षेप घेतला आहे. अशा मागणीचा अर्ज समविचारी आघाडीने निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडे दिला आहे. यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.




