कोल्हापूर – गोकुळमधील सत्ता बळकावण्यासाठी महायुतीने केलेल्या कुटील राजनीतीविरोधात आज आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकारातील लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूरकर दसरा चौकात एकत्र यायला सुरुवात झाली आहे.
हा संघर्ष मोर्चा दसरा चौकातून सुरु होवून जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकणार आहे. यावेळी “कोल्हापुरी बाणा,” ” सत्तेसाठी रडीचा डाव खेळणाऱ्यांना पायतान हाणा”, अशा आशयाचे मोठे कोल्हापूरी चप्पल,
यमराजाची वेशभूषा परिधान केलेला एक कार्यकर्ता तसेच “मला पण गोकुळ मध्ये स्वीकृत संचालक घ्या, असा फलक गळ्यात बांधलेली म्हैस मोर्चात सहभागी असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- या मोर्चात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह वकिलही सहभागी झाले आहेत.
- असा मोर्खाचा सदार धनंजय महाडिक यांनी येऊन बघावं, बंटी साहेबांनी एक हाक दिल्यावर किती माणसं जमतात – शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विराज पाटील
- “गोकुळ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं”, अशा जोरदार घोषणांसह काळे झेंडे घेवून हजारो कोल्हापूरकर मोर्चात सहभागी झाले आहेत.


- मोर्चाच्या ठिकाणी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकांचं आगमन…







त्यांना शेतकऱ्यांचा एवढा कळवळा असेल तर, त्यांनी आमच्या गोठ्यात यावं. आमच्या चार म्हैशी आहेत त्यापैकी तीन म्हैशी खूप वांड आहेत त्या तज्ञ संचालकांपैकी एकाला घेवून त्यांनी दूध काढून दाखवावं, असं आव्हान यावेळी त्याने दिले.
आम्ही त्यांना मत दिलं, ते आता कोरमचं सोंग काढत आहेत . पण आम्ही त्यांचा कोरम २०२९ मध्ये करू,असा टोला त्याने लगावला .
मुख्यमंत्री म्हणतात गोकुळ फक्त कोल्हापूर पुरतं मर्यादित आहे. मग राजकारण का करता ?, असा सवाल करत तो पुढे म्हणाला, मुळात गोकुळची क्रांतीची गर्जना ही कोल्हापूर मधूनच झालेली आहे. 2029 मध्ये कोणीही मतदान मागायला आले कि, त्यांना गोकुळचा प्रश्न विचारा, मागील दाराने हे असंविधानिक काम करत आहेत.
हे सर्व दरोडेखोर आहेत. तुमची पोरं राजकारणात जाणार म्हणून तुम्ही आम्हाला देवांच्या शपथा घ्यायला लावणार, हे अजिबात चालणार नाही. गोरगरिबांना शपथा देवून तुम्ही मलई खाल तर तुमचं चांगलं होणार नाही.
राजकीय नेत्यांनी, राजकीय स्वार्थासाठी सामान्य लोकांकडून चालवलेली लोकशाही, अशी अवस्था आम्ही कोल्हापूरमध्ये बघतोय. फडणवीस साहेब भविष्यात तुम्हाला कमळ फुलावं असं वाटत असेल आणि त्यासाठी राज्याच्या राजकारणाचा चिखल करणार असाल तर हे चालणार नाही असा इशाराही विवेकानंद पाटील यानं दिला.





