मुंबई – दोन्ही गटाला जबरदस्तीने नाव, चिन्ह दिले गेले. तुम्ही पक्ष चालवू शकत नाही. तुम्ही नेहमी गुडघ्यावरच राहणार. लवकरच हे पक्ष अस्तित्व गमावून बसतील. अजित पवारांनंतर हा पक्ष अनाथ झाला आहे. हा पक्ष शरद पवार यांचाच आहे, असा घणाघात खा. संजय राऊत यांनी केला आहे. नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भेट घेतली. या भेटीवरून त्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले.
अमित शहांनी महाराष्ट्राला दुबळे करण्यासाठी हे गट निर्माण केले आहेत. हे दोन्ही गट (शिवसेना, राष्ट्रवादी) काही दिवसात नष्ट होतील. अमित शहांच्या पायाशी बसता तुम्ही. हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे अमित शहांनी बांधले. यांना लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.




