कोल्हापूर – गोकुळ दुध संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी येत्या २९ तारखेला सर्व संचालकांची बैठक होणार आहे या बैठकीत अध्यक्षांची एकमुखाने निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १४ संचालकांचा कोरम समविचारी आघाडीला हवा आहे. त्यासाठी महायुतीच्या संचालकांची बातचीत केली जात आहे यावर बोलताना आ. सतेज पाटील यांनी, महायुतीच्या संचालकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मुख्य नेत्यांशी मी बोललो आहे. त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफ,आ. विनय कोरे,मंत्री चंद्रकांत पाटील, आ. चंद्रदीप नरके यांना फोन करून गोकुळच्या आगामी बैठकीसाठी त्यांच्या लोकांना पाठवण्याची विनंती केलीय. त्यामुळे आता सर्व नेत्यांनी सामोपचाराने निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.




