ब्रेकिंग न्यूज
सामाजिक

टाऊन हॉल गार्डनमधील बंद कारंजा पूर्ववत सुरू करण्याची मागणी

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – सन १८७२ ते १८७६ या कालावधीत तत्कालीन ब्रिटिश रॉयल इंजिनियर चार्ल्स मैन्ट यांनी जवळपास ८ एकरमध्ये टाऊन हॉल गार्डन आणि एक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली म्युझियमची इमारत बांधली. म्युझियम समोरच एक प्रशस्त आणि सुंदर कलाकुसर असलेला कारंजा उभा केला होता. गेली अनेक वर्षे तो सुस्थितीत सुरू होता. मात्र गेल्या काही वर्षापासून हा कारंजा बंद अवस्थेत आहे. बंद पडलेला हा कारंजा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी कोल्हापुरातील युथ फाऊंडेशन, रामेश्वर पत्की फाउंडेशन आणि परिख पुल नुतनीकरण समितीने केली आहे.

 याबाबत आज संग्रहालय सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी परितोष उरकुडे, फिरोज शेख, राहुल चौधरी, रामेश्वर पत्की, सुहास वायंगणकर, अभय नेर्लेकर, चंद्रकांत कांडेकरी, अॅड प्रमोद दाभाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top