मुंबई – राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आहे अशातच ऑक्टोबर च्य शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने आज पुढील चार आठवड्यांच्या विस्तारित अंदाज जाहीर केलाय. यामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसासोबतच चक्रीवादळ निर्मितीसाठी अनुकूल हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि आसपासच्या भागांतील हवामानातील बदलांचा देशातील काही भागांतील पावसावर परिणाम होऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.


