जालना – मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून, खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले, अशा ऑडिओची क्लिप दाखवत, तीन वर्षापासून माझ्या विरोधात षड्यंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपमधील लोकं शोधावीत, मला या सगळ्याची माहिती हवी आहे नाहीतर मी त्यांचा बाजार उठवणे, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर काही केलं नाहीत तर तुमचा ही यात सहभाग आहे असे समजू, असे ते म्हणाले आहेत. मराठ्यांविरोधात अशाच प्रकारचं षड्यंत्र चालू राहिल्यास 2029 ला मराठा समाज तुमच्या बाजूला उभे राहणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.




