सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांची धडपड सुरु झाली आहे. २१ जागांसाठी २६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. परंतु , निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते अज्ञातस्थळी बैठका घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याशी थेट संपर्कात राहून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.




