कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का देत आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. यावर बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, “महायुतीमध्ये अति आत्मविश्वास नडला,” अशी कबुली दिली आहे.
या निवडणुकीत महायुतीचे मंत्री, खासदार, आमदार असे अनेक दिग्गज नेते तर दुसरीकडे, आ.सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने ही लढत एकतर्फी केल्याने महायुतीला चांगलाच झटका बसला आहे. महायुतीकडून या निवडणुकीच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. यावर बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, “आमचं योग्य पद्धतीने काम सुरू होते. परंतु, ज्या पद्धतीने मतदारांनी कौल दिला, त्यामुळे आमचा अति आत्मविश्वास नडला.




