ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

गोकुळ निवडणूक : मतमोजणीवेळी केंद्रावर काही काळ तणावाच वातावरण… शाब्दिक वादावादी

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकूळ निवडणुकीतील अधिकृत निकाल जाहीर करण्यास अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्याने निवडणूक केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची एकत्रित आकडेवारी तयार करण्याचे काम सुरू आहे. यावेळी महायुती आघाडीचे चार ते पाच कार्यकर्ते संगणक जवळ जाऊन थांबले. त्यानंतर समविचारी आघाडीचे काही कार्यकर्ते जाऊन थांबले. यावर निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी कार्यकर्त्यांना फटकारले.
यावेळी समविचारी आघाडीचे अभिजित तायशेटे आणि निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर तायशेटे यांनी आमदार सतेज पाटील यांना मतमोजणी केंद्रावर बोलावून घेतले आहे. यावेळी आ. सतेज पाटील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top