ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

राजकारण करून तोंडातला घास काढून घेवू शकतो परंतु नशीब नाही : शशिकांत पाटील चुयेकरांचा महायुतीला टोला

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळच्या निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी अशी चुरशीची लढत पहायला मिळाली. यामध्ये राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारत विजयाचा झेंडा रोवलाय.

यावर बोलताना शशिकांत पाटील चुयेकर यांनी, वडिलांचा वारसा मला मिळाला आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे चालणार आहे. परमेश्वराकडे न्याय असतो राजकारण करून एखाद्याचा घास काढून घेवू शकतो परंतु कोणाचं नशीब काढून घेऊ शकत नाही, असा टोला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.
मागच्यावेळेस संधी हुकली होती. यावेळी आ. सतेज पाटील यांनी माझं नाव जाहीर केलं आणि नशिबाने मलाविजय मिळवून दिला त्यामुळे अत्यानंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top