कोल्हापूर – जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये २५ जागांसाठी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी अशी लढत पहायला मिळत आहे. यामध्ये सध्या समविचारी आघाडीने बहुमताकडं वाटचाल केल्याने आ. सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.
या चुरशीच्या लढतीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी 14 जागांवर तर छत्रपती शाहू विकास आघाडी 11 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. या यशामुळं कार्यकर्त्यांमधून जल्लोष साजरा केला जात आहे.




