कोल्हापूर – काल गोकुळच्या २५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी ५० उमेदवार रिंगणात आहे यासाठी ५ हजार ४१६ ठराव धारकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा निकाल काहीच वेळात समोर येणार आहे परंतु या निकालाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी, सर्व निकाल एकत्रपणे जाहीर करणार, असल्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे निकाल समोर येण्यास काही वेळ लागू शकतो.
मत मोजणी वेळी अधिकाऱ्यांना मतपेटीमध्ये मतदारांनी आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या काही चिठ्ठ्या लिहून टाकल्या होत्या. या चिठ्ठ्यांना माध्यमांपासून लपवत निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी या चिठ्ठ्या केराची टोपली दाखवली आहे.




