९९ पूर्णांक ९६ टक्के झालं मतदान…
कोल्हापूर – जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान झाले. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ९९ पूर्णांक ९६ टक्के इतके मतदान झाले आहे.
यामध्ये आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यात ९९ टक्के तर उरलेल्या सर्व तालुक्यात १०० टक्के मतदान झाल्याचे नोंद झाले आहे. यावेळी ५ हजार ४१८ मतदारांपैकी ५ हजार ४१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.




