कोल्हापूर – आज गोकुळ दुध संघाच्या २५ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये 50 उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत. यासाठी 5 हजार 418 मतदार असून दुपारी दोन पर्यंत जिल्ह्यात 87 टक्के मतदान झाले आहे.
दुपार दोन पर्यंत कागलमध्ये 100 टक्के मतदान झाल्याचे नोंद झाले आहे. यावेळी 619 पैकी 619 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.




