कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीसाठी आज मतदान होत असून सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यातील ९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान करण्यासाठी मतदारांची केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे. यावेळी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करत अनेक ठरावधारकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात ४३ पूर्णांक ५२ टक्के इतके मतदान झाले आहे.
यामध्ये आजरा 28. 52%, करवीर 47%, कागल 92%, गगनबावडा 20%, गडहिंग्लज 16 टक्के, चंदगड 13%, पन्हाळा 54%, भुदरगड 39 टक्के, राधानगरी 23 टक्के, शाहूवाडी 59%, शिरोळ 59%, हातकणंगले 24% असे जिल्ह्यात आतापर्यंत 43 टक्के मतदान झाले आहे. 5 हजार 418 पैकी आतापर्यंत 2 हजार 358 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.




