ब्रेकिंग न्यूज
सहकार

माजी आमदार शपथा घ्यायला लावतात, हे कोल्हापूरचं दुर्दैव : आ. सतेज पाटील

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी मतदानाच्या दिवशीही मतदारांना शपथा घालून भीती घालण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलाय तसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर बोलताना आ.सतेज पाटील यांनी, तुम्हाला काही तरी आजार होईल अशी भीती घालत एक  माजी आमदार शपथा घ्यायला लावतात, हे कोल्हापूरचं दुर्दैव असल्याचे म्हणत त्यांनी,गोकुळचे ठरावधारक धमक्यांना बळी पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गोकुळ सरदार वल्लभभाई पटेल फेडरेशनच्या घशात  घालण्यासाठी राज्यातील नेत्यांचा हस्तक्षेप वाढला आहे.  महायुतीतील वादामुळे महायुतीच्या नेत्यांना गोकुळ सांभाळता येणार नाही,  असा हल्लाबोल आ. सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top