साडे पाच हजार ठरावधारक आ. सतेज पाटील यांच्यासोबत : ऋतुराज पाटील यांचा विश्वास
कोल्हापूर – साडे पाच हजार दूध उत्पादक आणि ठरावधारक आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असल्याचा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला आहे. राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे करवीर तालुक्यातील ठरावधारक माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत मतदानासाठी एकत्र मतदान केंद्रावर आले होते. यावेळी मोठी गर्दी करत शिट्ट्यांचा आवाज घुमवत मोठ्या संख्येने ठरावधारक मतदानासाठी दाखल झाले होते.
यावेळी बोलताना ऋतुराज पाटील यांनी, ठरावधारकांचा कल कळताच महायुतीकडून शपथा घेतल्या जात आहेत. आ. सतेज पाटील हे लढणारं नेतृत्व असल्यानं दुध उत्पादक समविचारी आघाडीच्या पाठीशी ठामपणे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




