ब्रेकिंग न्यूज
सहकार

‘गोकुळ’चा पारदर्शक कारभार टिकवण्यासाठी समविचारी आघाडीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : आ. सतेज पाटील

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क..!

कोल्हापूर – दूध उत्पादक शेतकरी आणि प्राथमिक दूध संस्थांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि ‘गोकुळ’चा पारदर्शक कारभार टिकवण्यासाठी  मतदारांचा ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ला अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज गगनबावडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी आठ वाजता आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथील ‘श्री भैरवनाथ दूध व्यावसायिक संस्था, मुटकेश्वर’ या संस्थेचे प्रतिनिधी (ठरावधारक) म्हणून मतदान केले.

गोकुळचा विकास व उत्पादकांच्या हितासाठी समविचारी आघाडीच्या ‘शिट्टी’ या चिन्हासमोर शिक्का मारून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी समविचारी आघाडीचे उमेदवार बयाजी शेळके, भाग्यश्री धीरज डोंगळे, शशिकांत – पाटील चुयेकर, अभिजित तायशेटे आदींनी आपला  मतदानाचा हक्क बजावला.

संबंधित विषय

Scroll to Top