ब्रेकिंग न्यूज
शैक्षणिक

राज्यातील शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबण्याचे निर्देश…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – राज्यातील शिक्षकांना विविध प्रकार कामे दिली जातात. अध्यापन सोडून इतर कामे अधिक असतात, अशी शिक्षकांची सार्वत्रिक तक्रार आहे आता शासनाच्या शिक्षण विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये चला शाळेत जाऊ या विशेष शालेय स्वच्छता मोहिम राबवण्याचे परिपत्रक जारी केले आहे.

विदयार्थ्यांसाठी शाळांचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी रहावा तसेच अध्ययन आणि अध्यापनासाठी पोषक वातावरण तयार व्हावे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विदयार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाला एकत्र आणून माझी शाळा माझी जबाबदारी या भावनेतून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. १८ ते २४ ऑक्टोबर या पहिल्या टप्प्यात नियोजन आणि पूर्व तयारी केली जाणार आहे यात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेणे, वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, क्रीडांगण  आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २५ ते ३१ ऑक्टोबर या दुसऱ्या टप्प्यात शाळांची सखोल साफसफाई केली जाणार आहे. यामध्ये वर्गखोल्यांची स्वच्छता, स्वच्छता गृहांची विशेष स्वच्छता, पाण्याच्या टाक्यांची सफाई आदी कामे केली जाणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गटशिक्षणधिकारी, ते शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top