कोल्हापूर – गेल्या अनेक दिवसापासून कर्नाटक व महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी साखरेचा हमीभाव ५० रूपये व सी हेव्ही इथेनॉल ७० रूपये करा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे उद्यापासून कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखान्यातून बाहेर पडणारी साखर शेतकऱ्यांनी अडवून ठेवावी. देशात साखरेचा साठा नसल्याने साखर अडविल्यास साखरेची टंचाई होवून दर गगनाला भिडतील याशिवाय केंद्र सरकार वठणीवर येणार नाही, असे राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटले आहे.




