कोल्हापूर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आय.पेरमपल्ली यांनी मरेपर्यंतची शिक्षा सुनावली आहे.
सागर ससाणे असे नराधमाचे नाव आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अँड.ए.ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची ही घटना सन 2020 ते 2022 मध्ये करवीर तालुक्यात घडली होती.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाकडून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा




