‘आमचा पक्ष एकत्रच…’: खा. सुप्रिया सुळेंचं राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य

पुणे – राष्ट्रवादी एकत्रच आहे, आमचा पक्ष एकत्रच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आहे. पक्षाचे फाउंडर मेंबर कोण आहेत? पक्षाचा फाउंडर प्रेसिडेंट कोण आहे?, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट यांचं नाव शरद पवार आहे. पण चुकीच्या पद्धतीने तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. जर तुम्ही पक्षाचे संविधान पाहिले, तर शरद पवारांवर अन्याय झाला आहे आणि ती लढाई सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. माझी एवढीच मागणी आहे की, अधिकाराने आणि न्यायाने तो पक्ष शरद पवार यांना परत करावा. हा देश कोणाच्या मन मर्जीने चालत नाही, तर तो संविधानाने चालतो. पक्ष परत मिळाल्यानंतर पवार साहेबांनी त्या पक्षाचे काय करायचे, तो निर्णय त्यांनी घ्यावा. मग त्यांनी तो पक्ष कोणाला द्यावा किंवा नेतृत्व कोणी करावे, हा पूर्णपणे शरद पवारांचा निर्णय असेल, असे त्यांनी म्हटले.

Scroll to Top