नेपाळमध्ये हाहाकार…

नवी दिल्ली – नेपाळमध्ये अचानक महापुराने हाहाकार माजवला आहे. या महापुरात हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात पुरामुळे मोठी हानी झाली आहे. तिबेटमधून नेपाळमध्ये येणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. या महापुराची दाहकता खूप अधिक असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या महापुराचा धोका नेपाळमधील पाच जिल्हयांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी बचावासाठी सर्व यंत्रणा सर्तक झाल्या आहेत.

Scroll to Top