राष्ट्रीय

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

नवी दिल्ली – अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रिपब्लिकन्स पक्षाचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.
काँग्रेसच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहामध्ये डेमोक्रेटीक पक्षाने 219 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे अमेरिकेत सत्ता बदल झाल्याचे निश्चित झाले आहे. 435 पैकी 345 जागांचे निकाल जाहीर झाले असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन्स पक्षाला फक्त 126 जागा मिळाल्या आहेत.
सिनेटमध्ये डेमोक्रेटीक्सना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन्सना 41 जागा जिंकता आल्या तर डेमोक्रेटीक पक्षांनी सिनेटमध्ये 53 जागांवर विजय मिळवला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top