ब्रेकिंग न्यूज
सहकार

गोकुळ निवडणूक : शहरातील पाच केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या 25 जागांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील 35 केंद्रांवर 5 हजार 418 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सर्वाधिक मतदान असणाऱ्या करवीर तालुक्यातील 865 मतदार ताराबाई पार्क येथील न्यू मॉडेल स्कूल येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकुळच्या निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना, भाजप आणि इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीचे नेते निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे सर्वसामान्य दूध उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. अखेरच्या टप्प्यात महायुतीच्या नेत्यांनी मतदारांना दक्षिण भारत, बेंगलोर, बेळगाव ,आंबा अशा ठिकाणी मतदारांना सहलीवर नेले होते . शनिवारी रात्री उशिरा मतदारांना कोल्हापुरात आणण्यात आले असून आज सकाळी महायुतीच्या वतीने मतदारांना एकत्रितपणे मतदान केंद्रावर आणले जात आहे.
यापूर्वी गोकुळसाठी सर्व मतदारांना एकाच ठिकाणी ताराबाई पार्क या मतदान केंद्रावर मतदानाची सोय केली जात होती मात्र यावेळी प्रथमच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदानाची व्यवस्था केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top