‘या’ दिवशी श्री अंबाबाई देवीचं गाभाऱ्यातील दर्शन बंद…

कोल्हापूर – शारदीय नवरात्री उत्सव सुरु होण्यापूर्वी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाते. त्यानुसार येत्या ५ ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे त्यामुळे त्या दिवशी श्री अंबाबाई देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. त्या ऐवजी त्या दिवशी देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन मुख्य मंदिरातील सरस्वती मंदिरा शेजारी घेता येणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.

Scroll to Top