मुंबई – आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास भाजपचे कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्यावर महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण येथील एका पीडित महिलेला मदतीचे आमिष दाखवून एका कार्यालयात बोलावण्यात आले आणि तिथून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेण्यात आले. आरोपींनी पीडितेला शस्त्राचा धाक दाखवला, बळजबरीने दारू पाजली आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




