गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात ; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात…

कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आजपासून अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला आहे.
रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमधील निवडणूक कार्यालयात ही सर्व प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासह तब्बल ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी गटनिहाय नऊ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Scroll to Top