राज ठाकरेंच्या ‘या’ फेसबुक पोस्टची मोठी चर्चा…

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावल्याची चर्चा सुरु झाली आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे कि, “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते… तूर्तास एवढेच…” असे लिहिले आहे. त्यांच्या या मोजक्या शब्दांमागचा नेमका अर्थ काय, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईतील सिडको इथं प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, महाराष्ट्राच्या बहुभाषिकतेचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या भूमीवर मराठीसोबतच कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली यासह अनेक भाषांचा विकास झाला असून या सर्व भाषांचा सन्मान केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य देशात दुसरे नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Scroll to Top