मुंबई – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे मनोज जरांगेंची मुंबईकडील वाटचाल खडतर होणार आहे.
शाळा, आरोग्य आणि वाहतुकीचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असेही पोलिसांनी म्हटले आहे. यावर मनोज जरांगे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगेंची मुंबईकडील वाटचाल होणार खडतर…पोलिसांनी नाकारली परवानगी




