गोकुळ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ द्या : आ. सतेज पाटील

कोल्हापूर –  गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्यावतीने आमदार सतेज पाटील यांनी ठरावधारक आणि दूध उत्पादकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यानुसार रविवारी कागल शहरासह मौजे सांगाव, कसबा सांगाव, लिंगनूर दुमाला, बामणी, व्हानाळी, मुरगूड, माघाळ, सेनापती कापशी, नानीबाई चिखली, बानगे, कुरुकली, सुरुपली, निढोरी, फराकटेवाडी, बोरवडे आदी गावातील ठरावधारक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली.

यावेळी आमदार सतेज पाटील यांनी, सकाळी प्रामुख्याने समरजितसिंह घाटगे, माजी खासदार संजयसिंह मंडलिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, वीरेंद्र संजय मंडलिक, चंद्रकांत गवळी, माजी सभापती कृष्णात वसंतराव पाटील, युवराज अर्जुना पाटील, रमेश तोंडकर, शहाजी पाटील, एम. पी. पाटील, प्रविणसिंह पाटील, अमरसिंह घोरपडे, सूर्याजी घोरपडे, शशिकांत खोत, उदयबाबा घोरपडे, चंद्रसिंह भोसले, प्रविणसिंह भोसले, शिवानी भोसले, वाय. के. पाटील, प्रा. रवींद्र पाटील, विकासराव पाटील, रंगराव पाटील, सुनीलराज सूर्यवंशी देवदानंद पाटील, केशव काका पाटील, एकनाथ कळंबकर, बालाजी फराकटे, मनोज फराकटे या प्रमुख ठरावधारकांशी संवाद साधला. दरम्यान मुरगुड येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना आमदार पाटील यांनी गोकुळ दूध संघ ही साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांची भक्कम संस्था असल्याचे सांगितले.

गोकुळवर वैयक्तिक सत्ता किंवा राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी ही निवडणूक नाही, तर साडेपाच लाख शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि सहकारातील गोकुळ टिकवण्यासाठी हा लढा आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हक्काचा गोकुळ टिकवण्यासाठी एकमुखी साथ द्यावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

दरम्यान माजी संचालक रणजितसिंह पाटील – मुरगूडकर यांनी आमदार सतेज पाटील यांची ओळख दूध उत्पादक शेतकऱ्यांना खरा न्याय देणारे नेते म्हणून झाल्याचे सांगितले. मुरगूडमधील पाटील कुटुंबामध्ये अनेक वर्षांपासून जे अंतर पडले होते. ते या निवडणुकीच्या निमित्ताने कमी झाले. आम्हा दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणण्याचे काम आमदार पाटील यांच्यामुळे झाले. १९८३ पासून आमचे गोकुळशी घट्ट नाते असून, या तालुक्यातील सर्व ठरावधारक आ. सतेज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास माजी संचालक रणजसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक विनायक फाळके, राजू साबळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, संदीप बिरांजे, ईगल प्रभावळकर, दयानंद पाटील, सागर कोंडेकर, विनायक घोरपडे यांच्यासह पदाधिकारी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top