कोल्हापूर – समाजातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या उपेक्षित विद्यार्थ्यांना ममत्वाच्या भावनेने सांभाळून घेऊन त्यांच्यावरती संस्कार केल्यास सुंदर समाज घडू शकतो, असे प्रतिपादन श्रीमती सरोज एन.डी.पाटील यांनी केले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
हुतात्मा क्रांती संस्थेचा २०२६ आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती सरोज एन.डी.पाटील यांना यावेळी प्रदान करण्यात आला. यावेळी महिला विधीज्ञ स्नेहल जाधव यांच्या हस्ते सरोज एन.डी.पाटील यांना शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, संभाजीराव जगदाळे, मुसाभाई शेख, सतीश पोवार,माजी नगरसेवक सुभाष रामुगडे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी. आर भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संभाजी जगदाळे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी किशोर यादव, प्रशांत डकरे,दीपक म्हेतर, अनिल कोळेकर, किरण भोसले, अर्जुन शिंदे,सुनिल हंकारे, ज्येष्ठ प्राध्यापक टी एस पाटील, माजी शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, प्रा.संभाजी पाटील, प्रवीणा पिस्टे,प्रा.डॉ. किशोर गायकवाड यांच्यासह राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.




