आंदोलनापूर्वीच पोलिसांनी संजय पवार ,विजय देवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात

उपनेते संजय पवार पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज ठाकरे सेनेच्या वतीनं  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी  शिवसेना उपनेते संजय पवार ,सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं .शिवसेनेनं याचा तीव्र शब्दात निषेध केलाय .

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील खराब रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करत असल्याचा निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात  कार्यक्रमावेळी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात येणार होता. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार आणि संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. सत्ताधारी मंडळींसह प्रशासन जनतेच्या मूलभूत सुविधांकडं   दुर्लक्ष करतय असा आरोप करत .आंदोलन करण्यापूर्वी पोलीस बळाचा वापर करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या घटनेचा पवार यांनी निषेध नोंदवला.

यावेळी पोलिसांनी उपनेते संजय पवार ,सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,राजू यादव,पोपट दांगट, तानाजी आंग्रे, भीमराव पाटील, उदय सुतार, संजय जाधव ,दिनेश साळुंखे ,आदित्य कराडे ,विनोद खोत आदींना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून दिलं .

Scroll to Top