मुंबई – कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने कायमस्वरूपी रद्द केले आहे. त्याचबरोबर नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ आयुर्वेदिक उत्पादक संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे औषध उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे. या तपासणीमध्ये उत्पादक संस्थांच्या कारखाना परिसराची पर्याप्तता, आवश्यक व मंजूर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता, चांगल्या उत्पादन पद्धतींची अंमलबजावणी, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रत्यक्ष कामकाज, तसेच बॅच उत्पादन अभिलेखा, कच्चा माल व तयार मालाच्या चाचणीच्या नोंदी, प्रमाणित कार्यपद्धती, वितरण अभिलेख, तक्रार नोंदवही, स्थिरताविषयक माहिती अशा विविध बाबींची छाननी करण्यात आली
अन्न व औषध प्रशासनाचा राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादकांना दणका

