कोल्हापूर – राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब, गरजू, विधवा आणि दिव्यांग लाभार्थांना अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतून धान्य वितरीत केलं जातय.मात्र आता या योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थांची यादी समोर आलीय.
कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ४७६ लाभार्थी या योजनेचा लाभ घेतायत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनानं कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा निश्चित केलीय. त्यानुसार ग्रामीण भागासाठी ४४ हजार आणि शहरी भागासाठी ५९ हजार इतकी उत्पन्न मर्यादा ठेवलीय. ही मर्यादा ओलांडणारे तसंच कुटुंबातील सदस्य विविध सहकारी संस्था, बँका किंवा कंपन्यांचे संचालक आहे, अशा ३४ हजार ८३८ लाभार्थ्यांचे धान्य बंद केले जाणार आहे .त्यापैकी जिल्हाच्या पुरवठा विभागाकडून प्रत्यक्षात २३ हजार ५२३ लाभार्थ्यांचे धान्य पूर्णपणे बंद करण्यात आलंय तर ११ हजार ३१५ लाभ धारकांचे धान्य लवकरच बंद होणार आहे.


