कोल्हापूर – आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी कोल्हापुरातील विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण पडदा उघडून केलं.
यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सह पालकमंत्री तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, महापौर रूपाराणी निकम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

