कुंभमेळ्यासाठी कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणले, महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का? : राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई – नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणलेत, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं आहे, महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का?, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी नाशिकच्या कुंभमेळ्यावरून व्यक्त केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, ” वरून जे आदेश येतील तसे कुंभमेळे करायचे. महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी अशाच हाताळल्या जात असतील तर यांना लखलाभ असो. त्या वेळेला आम्ही इतकं सुंदर नाशिक केलं. त्याची दुर्दशा बघून वाईट वाटतं. बोटॅनिकल गार्डन असेल किंवा बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल… दुसऱ्याने केलं आहे म्हणून त्याची वाट लावायची. स्मार्ट सिटीची घोषणा केली होती. त्याचं काय झालं? कुठे गेली ती स्मार्ट सिटी?,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Scroll to Top