आंदोलन

करवीर तालुक्यातील शेतकरी आक्रमक : आम्हाला ठार मारा आणि शक्तीपीठ करा : महिला शेतकऱ्यांचा आक्रोश

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी होणार असल्याची माहिती करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली. यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोजणीसाठी येणाऱ्यांना ऊसाच्या बुडक्यानं झोडणार, असल्याचा संताप व्यक्त करत वाकरे फाटा परिसरात एकत्र जमले आहेत. यावेळी शेतकऱ्यांसह महिलांनी मोठी गर्दी केली आहे.
महामार्गासाठी आमची जमीन दिल्यास आम्हाला एक गुंठा सुद्धा जमीन राहत नाही. आम्ही कसं जगायचं.?, आम्हाला ठार मारा आणि शक्तीपीठ करा, असा आक्रोश महिला शेतकरी व्यक्त करत आहेत.
करवीर तालुक्यातील वाकरे फाटा परिसरात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या जात आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top