कृषी

‘गोकुळ’चे दूध महागले…उत्पादकांना दिलासा तर ग्राहकांच्या खिशाला कात्री

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ दुधाच्या खरेदी – विक्री दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली असून उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
गोकुळच्या संचालक बैठकीत म्हैशीच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांची तर गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ केली आहे. तर दुसरीकडे म्हैशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर ६ रुपयांची तर गायीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर ४ रुपयांची वाढ केली आहे. गोकुळला झालेली 70 कोटींची तूट भरून काढण्यासाठी दुध दर वाढीचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित विषय

Scroll to Top