कृषी

हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांसाठी दिलासादायक बातमी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय आणि शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू होते. अखेर या आंदोलनाला यश आले आहे. आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, “कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची घोषणा केली आहे.

१७ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले गेले होते. मात्र, शेतकऱ्यांचा तीव्र रोष पाहून आज या दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top