नवी दिल्ली – नवी दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते त्यावेळी आंदोलनांचे वार्तांकन करताना पत्रकारांना त्रास दिल्याचा, अडवल्याचा आणि ताब्यात घेतल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर युक्तिवाद करताना दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करत ,”रील स्टारला व्यावसायिक पत्रकारांसारखे संरक्षण मिळू शकत नाही”,असे विधान सर्वोच्च न्यायालयासमोर केले आहे.
केवळ हातात कॅमेरा आणि माईक असण्याने कोणीही पत्रकार होत नाही, तर त्यांच्या कामामागचा मुख्य हेतू काय आहे, यावरूनच ते पत्रकार आहेत की नाही हे ठरवले जावे. सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर रिपोर्ट करणाऱ्या इन्फ्लुएंसर आणि रील बनवणाऱ्यांना पत्रकार म्हणण्यास दिल्ली पोलिसांनी विरोध केला आहे. ‘केवळ हातात कॅमेरा आणि माईक असण्याने कोणीही पत्रकार होत नाही, तर त्यांच्या कामामागचा मुख्य हेतू काय आहे, यावरूनच ते पत्रकार आहेत की नाही हे ठरवले जावे’, असा युक्तिवाद पोलिसांनी केला आहे.




