निवडणूक

महाराष्ट्रासह सात राज्याच्या एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल तपासणी (SIR) प्रक्रियेबाबत नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यात महाराष्ट्रासह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एसआयआर प्रक्रियेमधील मिळालेल्या अर्जांवरील कार्यवाही १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे.
महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना हे आदेश पाठविण्यात आले आहे. त्यानुसार १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान या अर्जांचे वितरण आणि संकलन करण्यात येईल. त्यानंतर १० डिसेंबरपर्यंत अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top