कोल्हापूर – शहरातील गिर्यारोहक अन्वी घाटगे हिने राज्यातील सर्वोच्च शिखर असणारे कळसुबाई शिखर पाचव्यांदा सर केले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केवळ २ वर्ष ११ महिन्याची असताना १ जुलै २०२२ ला तिने सर्वप्रथम कळसुबाई शिखर सर केले होते. त्यानंतर दरवर्षी अन्वी कळसुबाई शिखर सर करत असते, यंदा पाचवे वर्ष असून, पांजरे या अत्यंत खडतर आणि कातळमार्गाने अन्वीने हे शिखर सर करत विक्रम नोंदवला आहे. अन्वी ला यासाठी प्रशिक्षक अनिता घाटगे, नाशिक वनविभागातील चंद्रकांत तळपडे, एकनाथ उघडे, चंद्रकांत उघडे यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई या शिखरावर चढाई केल्यानंतर “जल, जंगल, जमीन प्रदूषण मुक्त ठेऊयात” हा संदेश तिने शिखरावरून दिला. अन्वीने आतापर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोवा राज्यातील सर्वोच्च शिखरे तसेच हिमालयातील उत्तराखंड राज्यातील केदारकंठा हे शिखर सर केले आहे. आत्तापर्यंत तिने ७ विश्वविक्रम, ८ आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ८ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले आहे.
अन्वी प्रत्येक वर्षी महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून वेगवेगळी शिखरे सर करत “प्रदूषण मुक्त, प्लास्टिक मुक्त शिखरं ठेवूया…. गडावर कचरा टाकू नका.. गड किल्ले वाचवा निसर्ग वाचवा.. असे संदेश देत असते.




