सामाजिक

कोल्हापुरातील मोरे कॉलनीमधील रस्ता कामाचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहरातील संभाजीनगर येथील जुनी मोरे कॉलनी आणि श्रीकृष्ण कॉलनी परिसरात खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या फंडातून १५ लाख रुपये खर्च करून काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, सत्ता नसतानाही खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्या निधीतून विकास कामे पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले.

 भविष्यातही निधी उपलब्ध करून उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अॅड. कल्पना माने-पाटील , दिग्विजय मगदूम यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका दीपा मगदूम, सुयोग मगदूम, सुमन पाटील, सतीश पाटील, दत्तात्रय बामणे, अमित सासने, अभिजीत सासने, रमेश चावरे, मिलिंद पाटील, गोपाळ चव्हाण, जे. बी. मांडवकर, वैभव चौगुले, जयदीप पाटील, संदीप पाटील, निपुण चौगुले, शहाजी जाधव, संभाजी जाधव, तानाजी जाधव, जयवंत पाटील, संदीप पाटील, दिपाली चौगुले, सरोजिनी पाटील, रितेश शितूरकर आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top