इतर

कोल्हापूर बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याच्या एका पेटीला ५५ हजार रुपये दर..!

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – कोल्हापुरातील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याच्या सहा डझनाच्या एका पेटीचा सौदा सोमवारी  काढण्यात आला़. इम्रान बागवान यांच्या यासम बागवान अडत दुकानात काढण्यात आलेल्या या सौद्यात ग़णेश वळंजू या व्यापाऱ्याने 55 हजाराला  ही आंबा पेटी खरेदी केली़

कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील  यासम बागवान यांच्या दुकानात रत्नागिरीतील  आंबा उत्पादक शेतकरी स्वप्नील तांबे यांच्या आंबा बागेतील हापूस आंब्याच्या  एक पेटीची आवक झाली होती़ या आंब्याचा सोमवारी  सकाळी ९ वाजून ३० मिनिटाच्या मुहुर्तावर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे

सभापती प्रा शेखर देसाई व उपसभापती पांडूरंग काशिद यांच्या हस्ते सौदा काढण्यात आला़. व्यापारी वळंजू यांनी सहा डझन आंबे असलेली ही पेटी तब्बल ५५ हजार रुपयांना खरेदी केली़ यावेळी बाजार समितीचे सर्व संचालकांसह व्यापारी, अडते व शेतकरी उपस्थित होते़.

संबंधित विषय

Scroll to Top