अपघात

वारीसाठी निघालेल्या वाहनाच्या धडकेत सैनिक टाकळीच्या वारकऱ्याचा मृत्यू…परिसरातून हळहळ

pnigave अपडेट: 15 November 2026, 7:36 PM 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील वारकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास भोसेफाटा येथे घडली. उत्तम बाबासो पाटील (वय ५४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वारीसाठी निघालेल्या वारकऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सैनिक टाकळीसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तम बाबासो पाटील हे पंढरपूरच्या वारीसाठी निघाले होते. दरम्यान, भोसेफाटा येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या अचानक झालेल्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध मिरज ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित विषय

Scroll to Top