नवी दिल्ली – आज सकाळी नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील माउंट एव्हरेस्टच्या परिसरात हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.
यावेळी न्यूझीलंडचा एक नागरिक जखमी झाला आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिकही किरकोळ जखमी झाले आहेत. फिशटेल एअर आणि डायनेस्टी एअर या दोन कंपन्यांच्या हेलिकाप्टरची एकमेकांना धडक बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.




