क्राईम

सावर्डे येथे शेतामध्ये भानामतीचा प्रकार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील  ग्रामपंचायत सदस्य गणेश भोसले हे शेताकडे गेले असता त्यांना बांधावर संशयास्पद साहित्य आढळून आले. जवळ जाऊन पाहिले असता तिथे करणी किंवा भानामती करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. यामध्ये लिंबू, टाचण्या, कोहळा, गुलालातील भात, मिरच्या, हळद-कुंकू, नारळ आणि गुलालाचा समावेश होता.

यापूर्वी दिवाळीपाडव्याच्या दिवशी ओमकार गिरीबुवा यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ भाकरी-चटणी अज्ञाताने ठेवली होती. तसेच विठ्ठ्ल रसाळ यांच्या नवीन बांधत असलेल्या घरामध्ये सुद्धा दहीभात ठेवण्यात आला होता. अशा या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.

अंधश्रद्धेतून किंवा दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. अशाप्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यानुसार प्रतिबंध घालण्याची गरज आहे.

संबंधित विषय

Scroll to Top