मुंबई – गोकुळ दुध संघाच्या सत्तासंघर्षाची चर्चा राज्यासह केंद्रात रंगू लागली आहे. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आ. सतेज पाटील यांना फोन करून गोकुळच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या सत्तासंघर्षाच्या लढाईला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा मिळाला आहे.




